Shirur Accident News : शिरूर येथे भीषण अपघात! अपघातात शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू, घटनेने गावात हळहळ..

Shirur Accident News : शिरूर येथे दुचाकी घसरुन मागुन येणा-या वाहनाने दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. हा अपघात आज बुधवार (ता. २५) रोजी सकाळी झाला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. Shirur Accident News

सिद्धी चंद्रकांत गावडे (रा. टाकळी हाजी) असे मृत्यु झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, सिद्धी गावडे ही वडिलांसोबत दुचाकीवर टाकळी हाजी गावाकडुन शिरुरकडे येत होती. रामलिंग रोडजवळ रोशननगर येथे आली असताना रस्त्यावर दुचाकी घसरुन मागुन येणा-या अवजड वाहनाची धडक बसल्याने सिद्धी ही गंभीर जखमी झाली. स्थानिकांनी तत्काळ तिला दवाखान्यात नेले, मात्र तोपर्यंत सिद्धीचा दु्र्दैवी मृत्यु झाला.

या घटनेची माहीती मिळताच शिरुर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप, पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील, पोलिस हवालदार राजेंद्र वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
दरम्यान ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी खडी पसरल्यामुळे अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलिस करत आहेत.