शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा; स्व. अजित पवार यांच्या निधन पश्चात हार, बुके, सत्कार टाळून विधायक उपक्रम..


उरुळीकांचन : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे विकासपुरुष स्व. अजितदादा पवार यांच्या आकाली निधन पश्चात शिरुर-हवेली विधानसभेचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी आपला वाढदिवस फक्त आरोग्य शिबीरे व शेतकऱ्यांना सौर उर्जेकडे वाटचाल करा अशी मार्गदर्शक शिबीरे आयोजित करीत समर्थक व कार्यकर्त्यांकडून हार, नारळ,सत्कार साहित्य न स्विकारता अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या निधनाला आठ महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असताना त्यांच्या आकाली निधनाने राज्यातील जनता शोकसागरात आहे.गेली ३६ वर्षे त्यांनी पुणे जिल्हा तसेच राज्याची नेतृत्वाची धडक त्यांनी संभाळली होती राज्यात ११ अर्थसंकल्प , सार्वांगिण विकासाचे प्रयत्न , शेतकरी हिताचे निर्णय तसेच लोकप्रिय योजना राबवून त्यांनी राज्याच्या अर्थिक विकासात मोठे योगदान उभे केले होते. या कर्तृत्ववान नेत्याला महाराष्ट्र मुकल्याने राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील सदस्य म्हणून शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी आपला वाढदिवस आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा घेऊन साध्या पध्दतीने साजरा केला.

आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील आरोग्य केंद्रात आरोग्य शिबीर व शेतकऱ्यांना वीज टाळून सौरऊर्जा संच बसविण्याचे आवाहन करुन सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या कार्यकर्तूत्वावर बोलताना माझ्या सारख्या सामान्य शेतकरी मुलाला विधानसभेला संधी देऊन आमदार केले असल्याचा अभिमान व्यक्त केला. आम्हा तरूण आमदारांना ते एक उत्तम मार्गदर्शक होते. प्रशासनातील कामाची ओळख व त्यांची शिस्त आम्हाला शिकवण राहिली. त्यांच्या वर्षभरातील अर्थसंकल्पातील कामाची पावती म्हणून शिरूर – हवेलीत मोठे प्रकल्प सत्यात उतरुन सोळा हजार कोंटींची कामे प्रत्यक्षात उतरत असल्याचे ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!