Pankaja Munde : कोणी दाबला माझा आवाज? आता तुमची ताई…? दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांचे मोठे वक्तव्य.


Pankaja Munde  बीड : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर मागील काही दिवसांपूर्वीच कारवाई करण्यात आली होती. तेव्हा पक्षाकडूनच पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होतोय का असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता. Pankaja Munde

आज बीडमध्ये सावरगावात भक्तीगडावर पंकजा मुंडे Pankaja Munde  यांचा दसरा मेळावा विराट असा लोकसंख्येत पार पडला. पंकजा मुंडे भाषणाला उभ्या राहिल्यात तेव्हा लोकांनी एकच जल्लोष केला. त्यामुळे पंकजांनी आपल्या स्टाईलमध्ये सर्वांना समाजून सांगितलं. पण भाषण सुरू होत नाही तेच पंकजांचा माईक बंद झाला. यामुळे एकच गोंधळ उडाला.

मात्र, भाषणादरम्यान मध्येच माईक बंद झाला. आवाज येईना, तेव्हा कुणी कापली माझी वायर असे पंकजा मुंडेंनी विचारले. वायर कुणी तोडली रे माझी, काय प्रॉब्लेम आहे? आवाज येतोय का? आवाज कुणाचा? कोणी दाबला माझा दाबा, कोण घुसलं माझ्या मेळाव्यात , हळूच कोणीतरी वायर बंद केल्याचं दिसतंय. पण माझा आवाज आता कुणी दाबू शकणार नाही, असं म्हणत पंकजांनी तुफान टोलेबाजी केली.

‘तुम्ही सर्वजण राज्याच्या प्रत्येक विभागातून जिल्ह्यातून इथे आलात. माझ्या दसऱ्याच्या माझ्या परंपरेच्या कार्यक्रमात आलात, मी नतमस्तक होऊन स्वागत करते, तुम्हाला विजयादशमीच्या शुभेच्छा. आवाज पूर्ण देशात पोहोचला पाहिजे, असं म्हणत भगवान बाबा की जय अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!