Breaking News : राजकारणात खळबळ! निलेश राणेंचा राजकारणाला ‘जय महाराष्ट्र’; दसऱ्याच्या दिवशी केली मोठी घोषणा..


Breaking News : भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी दसऱ्याच्या दिवशीच मोठा निर्णय घेतला आहे. निलेश राणे यांनी अचानक राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. निलेश राणेंच्या ट्विटनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

निलेश राणेंनी हा निर्णय का घेतला याचे कारण अस्पष्ट आहे. निलेश राणे ट्विटने चर्चेने सिंधुदुर्ग जिल्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सोशल मीडिया पोस्ट करुन त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राजकारणात मन रमत नसल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. Breaking News

निलेश राणे यांनी पोस्ट करत म्हटले की, नमस्कार मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.

मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन.

निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र!

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!