Daund News : दौंड तालुक्यातील विजेच्या समस्याबाबत आमदार राहुल कुल यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, पायाभूत सुविधांवर केली चर्चा..


Daund News : दौंड तालुक्यातील विजेच्या विविध समस्यांबाबत आमदार ॲड. राहुल दादा कुल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच मुंबई येथे भेट घेतली.

यावेळी महावितरण, महापारेषण विभागाच्या संबंधित विविध समस्या, दौंड तालुक्यातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून प्रसंगी आमदार .राहुल दादा कुल पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत.

तालुक्यातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून प्रसंगी आमदार राहुल दादा कुल पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत. ते पुढील प्रमाणे.. Daund News

  • दौंड तालुक्यातील अतिभारीत उपकेंद्र व प्रस्तावित उपकेंद्रांसाठी तातडीने आवश्यक अतिउच्चदाब वाहिन्या व इतर पायाभूत सुविधा, निर्माण करण्यात याव्यात.
  •  दौंड तालुक्यातील राजेगाव, बोरीऐंदी, भांडगाव, वडगाव बांडे, रोटी, पडवी, कुरकुंभ, कानगाव, खुटबाव, व देऊळगांव गाडा आदी ठिकाणी नवीन वीज उपकेंद्रे उभारण्यात यावे.
  • दौंड तालुक्यातील पाटस, सहजपूर, रावणगाव, देऊळगाव राजे, कुरकुंभ, दहिटणे, पिंपळगाव आदी ३३/११ केव्ही उपकेंद्रांची क्षमतावाढ करण्यात यावी, याठिकाणी विजेची गरज लक्षात घेता अतिरिक्त रोहित्रे बसविण्यात यावीत.
  • पारगाव, १३२/३३/२२ केव्ही, पारगाव उपकेंद्र – ११ केव्ही, पारगाव फिडर, ३३/११ केव्ही, पारगाव गावठाण फिडर, ३३/११ केव्ही, केडगाव उपकेंद्र – ११ केव्ही, केडगाव फिडर, १३२/३३/२२ केव्ही, यवत उपकेंद्र- २२ केव्ही, पिंपळगाव फिडर ३३/११ केव्ही, हातवळण फिडर, ३३/११, शिंदेवाडी फिडर, ३३/११ केव्ही, दौंड उपकेंद्र- २२ केव्ही आदींचा आरडीएसएस फिडर सेप्रेशन योजनेत समावेश करण्यात यावा. Daund News

आमदार  राहुल दादा कुल यांनी केलेल्या मागण्यांची दखल घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले यावेळी आमदार जयकुमार भाऊ गोरे उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!