Uruli Kanchan News : “एक तारीख एक तास” स्वच्छता अभियानास उरुळीकांचन शहरात लागले हजारो हात! अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, अरोग्य सेवक विद्यार्थ्यांचा सहभाग..!!


Uruli Kanchan News उरुळी कांचन : राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरावडा अभियानातून राज्य शासनाच्या वतीने १ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमांतर्गत उरुळीकांचन ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या गाव स्वच्छता अभियानात शहरातील हजारो कार्यकर्त्यांचे हात स्वच्छ अभियानात लागून स्वच्छतेची सुंदर संकल्पना यशस्वीरीत्या राबविण्यात आली. या अभियानात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी स्वतः हा सहभागी होत स्वच्छतेची प्रेरणा दिली. Uruli Kanchan News

स्वच्छता पंधरावडा निमित्ताने एक तारीख एक तास अभियानाअंतर्गत उरूळीकांचन Uruli Kanchan News (ता.हवेली ) ग्रामपंचायतीने भव्य स्वरूपात या अभियानाचे आयोजन केले होते. ग्रामपंचायत हद्दीत सकाळी १० ते ११ या दरम्यान स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार शहरातील प्रत्येक प्रभागात ही मोहीम राबविली होती.

या अभियानात ग्रामस्थ, शाळा, हायस्कूल व कॉलेजचे विद्यार्थी तसेच शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्था, बचत गट, तरूण मंडळ, महिला मंडळ, उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रतिनिधी असे मिळून हजारो कार्यकर्ते स्वच्छता अभियानात सहभागी होऊन स्वच्छता करण्यात आली.

यावेळी हवेलीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी, उरुळी कांचनच्या मंडल अधिकारी नुरजहा सय्यद, रेल्वे क्षेत्रीय समितीचे सदस्य अजिंक्य कांचन, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष कांचन,उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, राजेंद्र कांचन, माजी उपसरपंच संचिता कांचन, सदस्य मयूर कांचन, शंकर बडेकर, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, आदी पदाधिकारी व नागरिकांनी स्वच्छता अभियानात सहभागी होऊन स्वच्छता अभियान पार पाडले. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी दत्तवाडी रस्ता, स्मशानभूमी परिसरात स्वतः हा हातात खराटा घेऊन स्वच्छता केली.

यावेळी त्यांनी अभियानातील सहभागी सामाजिक संस्था, स्वच्छता गृप यांची भेट घेऊन त्यांची प्रशंसा केली.महात्मा गांधी यांचे वास्तव्य लाभलेल्या उरुळीकांचन शहरात स्वच्छता अभियानानिमित्ताने सहभागी होता याचे समाधान त्यांनी ग्रामस्थांनी बोलताना व्यक्त केले. या अभियानातून ग्राम – स्तरावर स्वच्छता चळवळ उभी राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान एक तारीख एक तास अभियानानिमित्ताने शहरात राबविलेल्या स्वच्छता अभियानाने लोकसंकल्पनेचे आशादायी चित्र ग्रामस्थांना पहायला मिळाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!