MLA Disqualified : अखेर ठरलं! या दिवशी होणार अपात्र आमदार प्रकरणी अंतिम सुनावणी, जाणून घ्या…


MLA Disqualified मुंबई : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सोमवारी, २५ सप्टेंबर रोजी पार पडली. त्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीने सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या अशी मागणी करण्यात आली. तर या सर्वांना स्वतंत्र पुरावा द्यायचा असल्याने त्याची वेगवेगळी सुनावणी घ्यावी अशी मागणी शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली होती. MLA Disqualified

आता विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीचे वेळापत्रक निश्चित केले असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार अपात्रतेची सुनावणी नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. सर्व याचिकांवरील सुनावणी एकत्रित घ्यायची की नाही, याबाबत येत्या २० ऑक्टोबरला मोठा निर्णय होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, १३ ते २० ऑक्टोबर या कालावधीत कागदपत्रांची तपासणी होईल. त्यानंतर २३ नोव्हेंबरदरम्यान युक्तीवाद होईल. युक्तीवादानंतर दोन आठवड्यामध्ये अंतिम सुनावणी पार पडेल. शिंदे गट आणि ठाकरे गटाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी सुनावणीचे वेळापत्रक निश्चित केले आहे, अशी माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटाने २५ सप्टेंबर रोजीच्या सुनावणीत अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, ज्यामध्ये पाच मुद्द्यांचा समावेश आहे. त्यामुळे या आधारावर एकत्रित सुनावणी घेऊ शकतो असा ठाकरे गटाचा दावा आहे. शिवाय ,उलट तपासणी करण्याची गरज नाही असा युक्तिवाद ठाकरे गटाने मांडल्याची माहिती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!