Uruli Kanchan : डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेतर्फे पतसंस्थेतर्फे सभासदांना १५ टक्के लाभांश; अध्यक्ष राजेंद्र कांचन यांची माहिती..

Uruli Kanchan उरुळी कांचन : डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेतर्फे सभासदांना १५ टक्के लाभांश देणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी दिली आहे. (Uruli Kanchan)
डॉ मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार (ता.२१) रोजी संस्थेच्या मुख्यकार्यालयात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन होते. यावेळी बहुसंख्येने सर्व शाखांचे सभासद उपस्थित होते.
संस्थेच्या ३१ मार्च २०१३ अखेर ठेबी २४५ कोटी ३५ लाख, कर्ज १७९ कोटी ७० लाख व गुंतवणूक ९७ कोटी ५६ लाख आहे. संस्थेस ५ कोटी ६२ लाख दोवळ नफा व तरतुदी केल्यानंतर ३ कोटी ७१ लाख निव्वळ नफा झाला आहे. पतसंस्थेतर्फे सभासदांना १५ टक्के लाभांश देणार असल्याची माहिती यावेळी अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी दिली आहे.
संस्थेच्या शिक्रापूर, अकलुज (जि. सोलापुर) या दोन शाखा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. तसेच संस्थेतर्फे नियमित कर्ज भरणा-या कर्जदारांना यावेळी सन्मानित करण्यात आले आहे.
या संस्थेच्या वार्षिक सभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. यावेळी संस्थेचे प्रेरणास्थान डॉ गणिभाई देसाई यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन ज्ञानोवा कांचन, कांडीराम चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
तसेच यावेळी केडगाव शाखेचे सल्लागार शिवाजी आया मोनवणे (माजी उपाध्यक्ष, जि.प. पुणे), संतोष कांचन (अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन उरुळीकांचन), संतोष हरीभाऊ कांचन (माजी सरपंच, उम्ळीकांचन), डॉ. चंद्रकांत कोलते ( मा.जि. प. सदस्य पुणे ) लक्ष्मण म्हस्के, अशोक टिळेकर, सुरेश सातव, धनराज टिळेकर या सभासदांनी आपल्या सुचना मांडल्या आहेत.
या सभेस संचालक शरद वनारसे, भाऊसाहेब कांचन, कांतीलाल चौधरी, संजय कांचन, खेमचंद पुरुसवाणी, संजय टिळेकर, जीवन शिंदे, अनिकेत कांचन, सारीका काळभोर, कमल कांचन, रोहिदास उदे, प्रविण दरेकर इ. उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या सल्लागरांचा व विविध क्षेत्रात निवड झाल्याबद्दल संस्थेच्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित सभासदांचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी यांनी मानले.