Palghar Crime : आईनेच घेतला पोटच्या मुलीचा जीव, पाच दिवसांच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत, धक्कादायक कारण आलं समोर…


Palghar Crime  पालघर : आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. अवघ्या पाच दिवसांच्या चिमुरडीची आईने हत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर आले आहे. (Palghar Crime)

श्रेया प्रभू (वय. ३२ वर्ष) असे या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पालघरमध्ये तारापूर या ठिकाणी ही घटना घडली आहे. या महिलेला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. परंतु तिसऱ्या वेळेस तिला आपल्याला मुलगा होईल, अशी अपेक्षा होती. असे असताना मात्र तिला मुलगीच झाली. त्यामुळे रागाच्या भरात त्या महिलेने पाच दिवसाच्या चिमुकलीचा गळा दाबून तिला ठार मारले.

दरम्यान, त्या महिलेने याबाबत कोणाला माहिती होऊ नये म्हणून चिमुकलीचा मृतदेह नदीत फेकून दिला. आशा सेविका बाळाच्या तपासणीसाठी त्या महिलेच्या घरी गेली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली.

आशा सेविकेने शेजारी चौकशी केली असता शेजाऱ्यांनी ती बाळासोबत गेली मात्र एकटीच माघारी आली असे सांगितले. तारापूर पोलिसांनी या महिलेला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. या घटनेने मात्र खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!