Jalgaon Accident : राज्यात बसचा पुन्हा एकदा मोठा अपघात, जळगावत बस उलटली, दोन प्रवाशांचा मृत्यू; अन्य प्रवाशी जखमी..

Jalgaon Accident जळगाव : जळगावमध्ये मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात खासगी बसला भीषण अपघात झाला असून दुभाजकाला धडकून बस उलटली आहे. यात दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अनेक प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. (Jalgaon Accident)
तर जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. आज सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळ (Jalgaon Accident) बसला अपघात झाला. हा मुंबई नागपूर मार्ग असून नेहमीच वाहनांची वर्दळ असते.
आज सकाळी या मार्गावरून बस जात असताना चालकाला वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला असल्याचं सांगितल जात आहे. यावेळी बस दुभाजकावर आदळून थेट पुलावरून खाली कोसळली.
यात चार प्रवाशी गंभीर जखमी झाल्याने त्यांना पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णालयात दखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
तर अन्य काही प्रवाशी किरकोळ जखमी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांकडून या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे.