Pune Crime : सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकार्याची दीड कोटींची फसवणूक, तीन महिलेसह एकावर गुन्हा दाखल.

Pune Crime पुणे : फुटवेअर कंपनीत गुंतवणुक करण्यास सांगून कोणताही परतावा न देता कराराचा भंग करुन अति सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकार्याची १ कोटी ५५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक (Pune Crime) घटना समोर आली आहे.
याप्रकरणी, पुण्यातील मॉडेल कॉलनीमध्ये (Pune Crime) राहणार्या ७५ वर्षीय सेवानिवृत्त अति वरिष्ठ पोलिस अधिकार्याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार राजेश वसंतराव कारंडे (वय. ५७), निलेश वसंतराव कारंडे यांच्यासह ३ महिलांवर (सर्व रा. मॉडेल कॉलनी) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१७ पासून आतापर्यंत घडला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांना आरोपींनी त्यांच्या कास फुटवेअर प्रा. लि. कंपनीत गुंतवणुक करण्यास सांगितले. फिर्यादी यांच्या मुलाबरोबर त्यांनी पार्टनरशिप करुन कंपनीत १ कोटी ५५ लाख रुपये गुंतवणूक केली. या गुंतवणुकीपोटी पॉवर ऑफ अॅटर्नी करण्यात आली.
त्यांना शेअर्स सर्टिफिकेटही देण्यात येऊन करारनामा करण्यात आला होता, असे असताना राजेश कारंडे व इतरांनी फिर्यादी यांचे शेअर्स परस्पर ट्रान्सफर केले. त्यांना परतावा म्हणून दिलेले धनादेश परत आले.
दरम्यान, त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. त्यानंतर पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक जानकर अधिक तपास करीत आहेत.