Pune News : दही हंडीवेळी मोठी दुर्घटना, डीजेचा सांगाडा कोसळून चार महिला जखमी, चौघांवर गुन्हा दाखल…

Pune News पुणे : दही हंडी कार्यक्रमासाठी गणेश पेठेतील पांगुळ आळी (Pune News) येथे लायटिंग करण्यासाठी लावलेला लोखंडी पाईपचा सांगाडा कोसळून चार महिला जखमी झाल्या. याप्रकरणी मंडळाच्या पदाधिकार्यांबरोबरच चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना गणेश पेठेतील पांगुळ आळीमध्ये सादडी सदनसमोर (Pune News ) गुरुवारी (ता.७) सकाळी साडेदहा वाजता घडली आहे.
याप्रकरणी गणेश लालचंद चंगेडिया (वय ३८, रा. नाना पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. राहुल चव्हाण (रा. गणेश पेठ), अजय बबन सांळुखे, गोपी चंद्रकांत घोरपडे (रा. गणेश पेठ) आणि चेतन/सनी समाधान आहिरे (रा. खराडी) यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत मंदा लालचंद चंगेडिया (वय. ६७), निर्मलादेवी नवीन पुनमिया (वय. ६९), केवलचंद मांगिलाल सोळंकी (वय. ६६) आणि ताराबाई केवलचंद सोळंकी (वय. ६४) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या दही हंडी उत्सवात लायटिंग लावण्याकरीता लोखंडी पाईपचा सांगाडा उभारण्याचे काम सुरु होते.
सादडी सदन येथे काही महिला आल्या होत्या. सांगाडा उभारण्याचे काम सुरु असताना त्याच्या एका खांबाला दुचाकीचा जोरात धक्का लागला. त्यामुळे हा संपूर्ण सांगाडा खाली कोसळला.
त्यातील पाईप लागून चार ज्येष्ठ महिला गंभीर जखमी झाल्या. कोणत्याही सुरक्षित साधनाचा वापर न करता लोकांच्या जीवीतास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने लोखंडी पाईपाचा सांगाडा उभारल्याने चार महिला गंभीर जखमी होण्यास कारणीभूत झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.