उरुळीकांचन येथील साडेचार लाख इंन्स्टाफॉलअर्स असणाऱ्या गोल्डन बॉयला गंडा; मित्र म्हणविणाऱ्यानेच सोन्याला लावला चंदन…!

उरुळीकांचन : उरुळीकांचन येथील अंगावर मोठ्या प्रमाणात सोनं घालून रातोरात प्रसिद्ध मिळवलेल्या एका रिल्स स्टारकडून खंडणी उकळण्यात आल्याचे प्रकरण समोर आलं आहे. रिल्स स्टारने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंन्स्टाग्रामवर गोल्डन बॉय या नावाने प्रसिद्ध असलेल्या एका रिल्स स्टारला स्वतःला चोर म्हणून घेणाऱ्या एकाने चांगलाच गंडा घातला आहे. तक्रारदार रील्स स्टारची 18 तोळे वजनाची सोन्याची चैन घालण्यासाठी आरोपीने घेतली होती.
मात्र ही चैन परत मागितली असता आरोपीने तू खूप मोठा रिल्सस्टार आहेस ना, कशी तुझी सगळी हवा काढतो असे म्हणून त्याच्याकडूनच तब्बल दोन लाख रुपयांची खंडणी उकळली आहे.
अधिक पैशांची मागणी होऊ लागल्याने रिल्स स्टारने शेवटी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. दरम्यान सोने लुबाडणारा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहरात विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.