हॉटेलमध्ये पार्टीसाठी बोलावले, दारु पाजून तरुणीवर केले ‘हे’ कृत्य, पुण्यातील धक्कादायक घटना..

पुणे : विमाननगर मधील एका हॉटेलमध्ये तरुणीला मद्य पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी सौदागर येथील एका २८ वर्षाच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिषेक सत्तुजी टिक्कल (रा. चंदननगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपीने पीडित तरुणीला विमाननगर भागातील एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी बोलावले होते. .पार्टीत ड्रिक घेण्याचा आग्रह केला. तिने नकार दिल्यानंतरही जबरदस्तीने आग्रह करुन दारु पिण्यास लावली. दारु मुळे फिर्यादीला त्रास होऊ लागला.
तेव्हा त्याने दारुच्या नशेत फिर्यादींना लेमन ट्री हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. तिचे न्युड फोटो काढले. त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन इतर ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला.
दरम्यान, या सततच्या अत्याचाराचा कंटाळून शेवटी फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक गोताडे तपास करीत आहेत.