‘तुझ्याशिवाय जगू शकणार नाही… , शाळकरी मुलीवर बलात्कार; येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा..

पुणे : तुझ्याशिवाय जगू शकणार नाही, असे म्हणून लग्नाचे आमिष दाखवून एका १५ वर्षाच्या शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मे २०२३ मध्ये येरवड्यातील लक्ष्मीनगरमध्ये घडली आहे.

नरेश अण्णा धनगर (रा. ताडीवाला रस्ता) असे गुन्हा दाखल करण्यात आरोपीचे नाव आहे. तर याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी नरेश धनगर याने या अल्पवयीन मुलीशी मैत्री करुन तिला जाळ्यात ओढले. मोटारसायकलवरुन फिरायला जाण्याच्या बहाण्याने लक्ष्मीनगर येथील मित्राच्या रुमवर नेले.

तेथे या मुलीला प्रपोज करुन तिला तुझ्याशी लग्न करणार आहे. तिच्याशिवाय जगू शकणार नाही, असे म्हणून तिच्याशी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. या प्रकाराची वाच्यता केल्यास मुलीला जीवे मारण्याची धमकी धनगरने दिली होती.
दरम्यान, मुलीच्या वडिलांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा गुन्हा येरवडा पोलीस ठाण्याच्या परिसरात घडल्याने बंडगार्डन पोलिसांनी तो येरवडा पोलीस ठाण्यात वर्ग केला असून पोलीस उपनिरीक्षक लिंगे तपास करीत आहेत.