भारतातील पहिली इलेक्ट्रीक सोलर कार पुण्यात, उन्हापासून होणार चार्ज, जाणून घ्या…


पुणे : पुण्यातील स्टार्टअप कंपनीने पुढे जाऊन मोठे पाऊल टाकले आहे. वायवे मोबिलिटीने देशातील पहिली इलेक्ट्रिक व सौरउर्जेवर चालवणारी कार बनवली आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू आहे.

देशात सध्या इलेक्ट्रीक कारचा बोलबाला आहे. त्यामुळे तुम्ही कार खरेदी करण्याच्या विचारात असला तर जरा थांबा. वायवे मोबिलिटने देशातील पहिली इलेक्ट्रिक व सौरउर्जेवर चालवणारी कार बनवली आहे. ही कार लवकरच बाजारात येणार आहे.

या कारचा तुम्हाला फायदाच फायदा आहे. या गाडीचे नाव Eva आहे. देशातील ही पहिली सोलर इलेक्ट्रिक कार असल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे. कारमध्ये दोन वयस्क व एक मुल बसू शकते. कारला दोन दरवाजे आहेत. मुंबई, पुणे, नागपूरसह सामान्य शहरे लक्षात घेऊन कार बनवण्यात आली आहे. कार रोज 10 ते 12 किलोमीटर सोलरवर चालणार आहे.

मुलांना शाळेत सोडायला तसेच इतर कामे करत असताना या गाडीचा वापर होणार आहे. गाडीचा वेग 70 किलोमीटर प्रतितास आहे. गाडीत 14Kwh क्षमतेची बॅटरी लावण्यात आली आहे.

या कारच्या टपावर सोलर पॅनल देण्यात आले आहे. परंतु ही कार पुर्ण सोलर उर्जेवर चालणार नाही. सोलर पॅनल हा एक पर्याय देण्यात आला आहे. सोलर पॅनलमुळे 10 किलोमीटरचा अतिरिक्त मायलेज वाढणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!