आयटीआर फाइल करणाऱ्यांसाठी पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले, ४ लाखावरून १३ लाख उत्पन्न….

नवी दिल्ली : सध्या आयटीआर फायलिंगच्या आकडेवारीवरून मागील नऊ वर्षांत सरासरी उत्पन्न तिप्पट झाले आहे. यावरून दिसून येते की विविध क्षेत्रांमध्ये मजबूती आणि रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत.

याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, २०१४ पूर्वी देशात भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे युग होते आणि गरिबांचे हक्क आणि पैसे लुटले जात होते. पण आता प्रत्येक पैसा थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जात आहे.
पाच वर्षांत १३.५० कोटी भारतीय बीपीएल कॅटेगरीतून बाहेर आले आहेत. अमृत कालच्या पहिल्या वर्षातच सकारात्मक बातम्या येण्यास सुरुवात झाली आहे, ज्या वाढती समृद्धी आणि कमी होत असलेली गरिबी दर्शवतात.

इन्कम टॅक्स रिटर्नचा डेटा दर्शवितो की, मागील नऊ वर्षांत भारतीयांचे सरासरी उत्पन्न ४ लाख रुपयांवरून १३ लाख रुपयांपर्यंत वाढले आहे. लोक अल्प उत्पन्न गटातून उच्च उत्पन्न गटाकडे जात आहेत. सर्व क्षेत्रांना बळ मिळत असून रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
देशाची अर्थव्यवस्था २०१४ मध्ये जगातील १० व्या स्थानावरून आता ५ व्या स्थानावर पोहोचली आहे. २०१४ पूर्वी भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या युगात गरिबांचे हक्क आणि त्यांचा पैसा त्यांच्या खात्यात पोहोचण्याआधीच लुटला जात होता.
आता एक-एक पैसा थेट त्यांच्या खात्यात जातो. मध्य प्रदेश रोजगार मेळाव्याला संबोधित करताना केले. नीती आयोगाच्या अहवालाचा दाखला देत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.