आशिया कप २०२३ साठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ दोन स्टार खेळाडूंचा समावेश नाही..


नवी दिल्ली : आशिया चषक सुरू होण्यासाठी आता जवळपास 10 दिवस बाकी आहेत. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अद्याप या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केलेली नव्हती. दरम्यान, आता मात्र 2023 च्या आशिया कपसाठी भारतीय संघाची निवड केली आहे.

बीसीसीआयने 2023 आशिया चषक स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केलेला आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड 21 ऑगस्ट रोजी 2023 आशिया कपसाठी आपला संघ जाहीर केला. आतापर्यंत पाकिस्तान, बांगलादेशने आपापले संघ जाहीर केले आहेत.

हरभजन सिंगने श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसनचा 2023 च्या आशिया कप संघात समावेश केलेला नाही. अय्यर दुखापतीतून सावरत असून तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. त्याचबरोबर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत सॅमसन काही विशेष करू शकला नाही.

आशिया कपसाठी 16 सदस्यीय संघ निवडला आहे. 16वा खेळाडू म्हणून अक्षर पटेलची निवड केली आहे. युवा फलंदाज तिलक वर्मालाही संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय त्याने केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांचीही निवड केली आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर या चार वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे.

याशिवाय त्याने युझवेंद्र चहल, कुलदीप यादव यांचा फिरकी गोलंदाज म्हणून समावेश केला आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांच्यावर विश्वास ठेवला आहे. आशिया कपसाठी हरभजन सिंगचा १५ सदस्यीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, हार्दिक पांड्या, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर. , सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (राखीव).

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!