पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर कोट्यावधींचा खर्च,आकडा वाचून डोळे होतील पांढरे…!

नवी दिल्ली : दिल्लीत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व मंत्र्यांचा परदेशी दौऱ्याचा खर्च हा विषय समोर आला आहे. त्यांच्या परदेश दौऱ्यावर आतापर्यंत कोट्यावधी रुपये खर्च झाले आहे.

याबाबत परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली. यामध्ये 2019 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 परदेश दौरे केले आहेत, ज्यावर 22.76 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे.
तसेच राष्ट्रपतींनी 2019 पासून आठ परदेश दौरे केले असून त्यावर 6.24 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली आहे. यामुळे हा आकडा खूपच मोठा आहे.

तसेच त्यांनी सांगितले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आतापर्यंत फक्त एकच दौरा केला आहे. पंतप्रधानांनी 21 आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी 86 परदेश दौरे केले आहेत.