पुण्यात 75 हजार लाडक्या बहिणींकडे चारचाकी! गुन्हा दाखल होणार? आता करायचं काय? बहिणींचे टेंशन वाढलं, यादीही आली समोर…

पुणे : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना काही महिन्यांपासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत अर्जाची फेरतपासणी सुरू होणार आहे. आता बहिणींचे टेन्शन वाढले आहे.
अशातच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी जिल्हा परिषदेकडे चारचाकी असलेल्या लाडक्या बहिणींंची यादी आली आहे. यामुळे यामध्ये सगळंच समोर आलं आहे. शासनाकडून आलेल्या यादीमध्ये पुणे जिल्ह्यातील 75 हजार 100 लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे चारचाकी वाहन असल्याचे समोर आले आहे.
यामुळे आता त्यांना लाभ मिळणार नाही. या यादीनुसार आता अंगणवाडी सेविका बहिणींच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहेत. यामुळे बहिणींना पैसे मिळणार नाहीत. ज्या लाडक्या बहिणींकडे चारचाकी वाहन आहे त्या महिला आता अपात्र होणार आहे. या पडताळणीसाठी राज्य सरकारने नवीन मोहिम राबवली आहे.
आता पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका तुमच्याकडे तुमच्या घरी येऊन पडताळणी केली जाणार आहे. जर त्यामध्ये तुमच्याकडे चारचाकी वाहन असल्याचे आढळले तर तुम्हाला योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे. महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी ऑनलाईन पध्दतीने बैठक घेत सर्व अधिकाऱ्यांना ‘लाडक्या बहिणींच्या’ घरी जाऊन चारचाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासंबंधीचे आदेश दिले होते.
निकष पूर्ण न करणाऱ्या तसेच बनावट कागदपत्रे लाभार्थ्यांवर कारवाई होणार असल्याची धास्ती राज्यातील अनेक लाडक्या बहिणींमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये भीतीचे वातावरण आहे, काही महिलां स्वतःहून मिळालेला लाभ नाकारत आहेत. दरम्यान बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या काही लाडक्या बहिणींवर पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
जानेवारी २०२५ पर्यंत या योजनेच्या सात हप्त्यांचे प्रत्येकी दिड हजार रुपये प्रमाणे १० दहा हजार ५०० रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. मात्र, पात्रतेची तपासणी सुरू असल्याने कारवाईच्या भीतीने अनेक महिला योजनेचा लाभ नाकारत अर्ज करताना दिसत आहेत. जानेवारी महिन्याचा हफ्ता काही दिवसांपूर्वी सर्व महिलांच्या खात्यात जमा झाला आहे.