राम मंदिर उभारणीच्या साहित्यात रामजन्मभूमी ट्रस्टने भरला जीएसटी ! जीएसटी ने सरकारला ४०० कोटींचा फायदा ….


इंदूर : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी लागणा-या साहित्याबाबत श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले, राम मंदिराच्या बांधकामासाठी वापरल्या जाणा-या प्रत्येक साहित्याचे पैसे आम्ही दिले आहेत. मंदिराच्या उभारणीसाठी आणलेल्या साहित्यावर सरकारला जवळपास ४०० कोटी रुपयांचा जीएसटी मिळणार आहे.

मध्य प्रदेशातील इंदूर येथे आयोजित एका कार्यक्रमात चंपत राय यांनी ही माहिती दिली. इंदूरमधील एका कार्यक्रमादरम्यान राममंदिर जन्मभूमी तीर्थ ट्रस्ट क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी मंदिर उभारणीसाठी खर्च झालेल्या पैशांबाबत विधान केले. ते म्हणाले की, राम मंदिराच्या उभारणीसाठी आम्ही देशभरात ४२ दिवसांचे समर्पण निधी अभियान सुरू केले होते.

४२ दिवसांत २८०० कोटी : चंपत राय यांनी सांगितले की, ४२ दिवसांच्या समर्पण अभियानात देशातील १० कोटी जनतेने देवावर श्रद्धा दाखवली आणि मंदिराच्या बांधकामासाठी पैसे दिले. लोकांनी ४२ दिवसांत २,८०० कोटी रुपयांची देणगी दिली. मंदिराच्या उभारणीत लोकांनी केवळ मदतच केली नाही तर सरकारला सहकार्यही केले आहे.

तसेच, भारत सरकारने मंदिराच्या बांधकामासाठी ट्रस्टच्या बदल्यात एक रुपया दिला होता. जो फ्रेम करून मंदिराच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आला आहे, असेही चंपत राय यांनी सांगितले.

चंपत राय यांनी कार्यक्रमात लोकांना संबोधित करताना सांगितले की, मंदिरात बसवलेल्या दगड आणि लाकडासाठी पैसे देण्यात आले आहेत. दरम्यान, राम मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानातून दगड आणण्यात आले होते आणि लाकूड महाराष्ट्रातून आणण्यात आले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!