एसटी महामंडळात २ हजार कोटींचा घोटाळा? मुख्यमंत्री फडणवीसांचा अधिकाऱ्यांना दणका, सगळ्यांची चौकशी होणार…

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळातील एक निर्णय सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. सरकारला अंधारात ठेवून अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे फडणवीस आक्रमक झाले आहेत.
या निर्णयात खास कंत्राटदारावर मेहेरनजर दाखवली असल्याची चर्चा आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तसेच परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांमार्फत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत माहिती अशी की, एसटी महामंडळाने १३१० बसेस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही प्रक्रिया राबवण्यात आली होती. सध्याच्या पद्धतीनुसार विभागनिहाय गाड्या घेण्याची पद्धत बंद करून सर्व विभागांची केवळ तीन समूहांत विभागणी करण्यात आली.
असे असताना या सगळ्या निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा झाला असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्दशनास आले. प्रत्येक समूहात किमान ४००-४५० याप्रमाणे सात वर्षांसाठी १३१० गाडया भाडेत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला गेला होता. यामध्ये तीन कंपन्यांची निवडही करण्यात आली.
दरम्यान, या निर्णयामुळे तब्बल २००० कोटींचा फटका बसू शकतो असे मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी याला स्थगिती देत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.