Zika Virus : पुणेकरांसाठी धोक्याची बातमी! झिकाची रूग्णसंख्या ५२ वर, अजून दोन संशयित रुग्णांचा मृत्यू…


Zika Virus : पुणे शहरात झिका व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. रुग्णसंख्या ५२ वर पोहोचली आहे. आतापर्यंत शहरातील झिकाचा संसर्ग झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या ४ जणांच्या मृत्यूंचे परीक्षण करणार आहे. त्यातून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पुणे महापालिका हद्दीतील आणखी दोन झिकाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाल्याच आढळून आले आहे.

मृत्यूनंतर प्राप्त झालेल्या रुग्णांच्या नमुन्यांचा झिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मृत रुग्णांमध्ये कोथरूड मधील ६८ वर्षीय, तर बाणेर येथील ७८ वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.

दरम्यान, यापूर्वी दोन ज्येष्ठांचा झिकामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यांना इतर व्याधी देखील असल्याने त्यांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास करण्यात येत आहे.

शहरात यापूर्वी दोन झिका संशयित मृतांची नोंद झालेली आहे. आता चारही संशयित मृत्यूंचे अहवाल पुनरावलोकनासाठी राज्य शासनाच्या समितीकडे पाठवण्यात आलेले आहेत. कोथरूड येथील रुग्णाचा २२ जुलै रोजी मृत्यू झाला होता. या रूग्णाला ताप आणि उलट्या अशी लक्षणे दिसून आली होती. Zika Virus

त्यांच्या रक्ताचे नमुने १७ जुलैला एनआयव्हीकडे पाठवण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट ३१ जुलै रोजी प्राप्त झाला त्यामध्ये हे रूग्ण झिका पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. मात्र, या वृध्दांच्या मृत्यूच्या कारणांमध्ये मल्टिपल ऑर्गन फेल्युअर आणि सेप्टिक शॉकचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!