तरुणांनो लागा कामाला!! राज्यात होणार सर्वात मोठी पोलीस भरती, निघणार 10 हजार पदांची भरती, जाणून घ्या…

मुंबई : तरुणांसाठी आता एक गुड न्यूज समोर आली आहे. लवकरच महाराष्ट्रात दहा हजार पदांसाठी पोलीस भरती जाहीर केली जाणार आहे. ऑक्टोबर महिन्यात दहा हजार पोलिसांची भरती करण्यात येणार असून या अनुषंगाने एक प्रस्ताव देखील तयार करण्यात आला आहे.
यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत तरुणांनी आता तयार राहावे. या दहा हजार पदांच्या पोलीस भरतीच्या मान्यतेसाठी गृह विभागाला नुकताच एक प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती आहे. याबाबत लवकरच अधिकृतपणे घोषणा करण्यात येणार आहे.
याबाबत गृह विभागाकडून या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय झाला तर ऑक्टोबर महिन्यात दहा हजार पदांसाठी पोलीस भरती आयोजित केले जाणार आहे. यामुळे तरुणांसाठी ही एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सध्या अनेक तरुणांनी याबाबत मागणी केली आहे.
यामध्ये दहा हजार पदांच्या भरती प्रक्रिया अंतर्गत बँड्समन, चालक शिपाई, पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलिस बलातील अंमलदार या पदांची भरती केली जाणार आहे. यामुळे आता अनेक तरुण देखील तयारी करत आहेत. सरकारने निवडणुकी आधी याबाबत आश्वासन दिले होते.
दरम्यान, या पदभरती अंतर्गत सुरुवातीला मैदानी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर मग राजधानी मुंबई वगळता सर्वत्र एकाच वेळी लेखी परीक्षा आयोजित केली जाईल, अशी माहिती समोर येत आहे. याबाबत अधिकृत माहिती लवकरच समोर येईल.
भरतीत उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार अशी माहिती सुद्धा यावेळी समोर आली आहे. या पद भरतीसाठी उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अनेकदा अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज दाखल करतात आणि परीक्षा देतात.