गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी तरुण चढले विजेच्या डीपीवर, गौतमीसह प्रेक्षकांनी मारला कपाळावर हात..!!

Gautami Patil : सतत चर्चेत असलेली गौतमी पाटील हिची एक झलक बघण्यासाठी युवक गर्दी करत असतात. गौतमी पाटील हिचा कोणत्याही कार्यक्रम असो तिथे तुडूंब अशी गर्दी बघायला मिळते. हेच नाही तर गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पोलिसांना लाठीचार्ज करावा लागतो.
तसेच गावागावांत जत्रा, सण समारंभाच्या निमित्ताने गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित केले जातात. लोकांना उभे राहता येत नाही इतकी गर्दी गौतमीच्या कार्यक्रमांना असते. या गर्दीमुळे गौतमी अनेकदा वादात देखील अडकली आहे. नुकतीच गौतमी ही लातूर शहरात एका बिर्याणी हॉटेलच्या ओपनिंगसाठी पोहचली होती.
यावेळी गौतमी पाटील हिची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली. पाय ठेवायला देखील अजिबातच जागा नव्हती. या ठिकाणी गौतमीच्या नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. त्यामुळे तरुणांची तुफान गर्दी होती.
दरम्यान, गौतमीला पाहण्यासाठी काही युवक हे थेट विद्युत डीपीवरच चढून बसले होते. यामधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या टीपीमध्ये विद्युत प्रवाह सुरूच होता. गौतमीला पाहण्याच्या नादात, ते थेट डीपीवर चढून बसेल. या युवकांचे नशीब बलवत्तर की, त्यामुळे कोणताही चुकीचा प्रकार घडला नाही. यानंतर गौतमीने युवक डीपीवर चढल्याचे पाहिले त्यानंतर तिनेच स्वतः त्या युवकांना खाली उतरण्यास सांगितले.