मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात 3 ठिकाणी भूकंपाचे धक्के, सांगोला केंद्रबिंदू, लोकांमध्ये भीतीचे वातावरण…


सोलापूर : जिल्ह्यात आज भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगितले गेले आहे. यामुळे सोलापूरसह जिल्ह्यातील नागरिकांमध्ये काहीशी भीती पसरलली आहे. पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा येथे 2.6 रेक्टर स्केल भूकंपाच्या तीव्रतेचे धक्के जाणवले आहेत.

याबाबत राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याबाबतचे ट्विट करत माहिती दिली आहे. सुदैवाने या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नाही. मात्र, भूकंपाचे वृत्त समजताच नागरिकांच्या मनात काहीशी भीती निर्माण झाली आहे. यामुळे परिसरात याचीच चर्चा सुरु होती. आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात भूकंपाचे केंद्रस्थान आहे.

भूकंपाचे धक्के हे सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी काही क्षणासाठी जाणवले असल्याची माहिती आहे. सातारा जिल्ह्यात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असतात. येथील कोयना परिसरात भूकंपाचे केंद्र असते, सौम्य भूकंपाच्या धक्क्यांनी येथील परिसर काहीसा हादरुन जातो. अशातच आज सोलापूरमध्ये भूकंप झाल्याने याची चर्चा सुरु आहे.

दरम्यान, गेल्याच आठवड्यात थायलंडमध्ये भूकंपाचे मोठे धक्के बसल्याने बँकॉकसह शेजारील देशांचं मोठं नुकसान झालं आहे. उंचच उंच इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्याचं दिसून आलं. या दुर्घटनेत मोठी वित्तहानी व जीवितहानी झाली होती, यामुळे भीतीचे वातावरण आधीच आहे.

यामध्ये हजारांपेक्षा अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेचे व्हिडिओ देखील मनाला चटका देणारे आहेत. आता राज्यात देखील भूकंप झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरणनिर्माण झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!