कारागृह महिला शिपायाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; येरवडा पोलिसांनी वरिष्ठ जेलरला ठोकल्या बेड्या..

पुणे : एकतर्फी प्रेम व्यक्त करुन कारागृह महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या जेलरने महिलेच्या घरी जाऊन तिच्यावर अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपीला येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
वरिष्ठ जेलर योगेश भास्करराव पाटील (वय ५२, रा. जेलर बंगला, जेल वसाहत, कोल्हापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका ३९ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात दिली आहे.
मिळलेल्या माहिती नुसार, फिर्यादी या कारागृह शिपाई म्हणून काम करतात. आरोपी योगेश पाटील याच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे. पाटील फिर्यादी यांना वारंवार फोन करुन तो गुन्हा मागे घे व माझ्याशी बोल, मी तुझ्याशिवाय जगु शकत नाही, असे बोलत असे.
सोमवारी (ता.१४) रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या कामावरुन घरी येतअसताना त्याने फिर्यादी यांना गाठले. मला माहिती आहे तू भाड्याचे घरात राहतेस. आधीच तुझ्या इज्जतीची थु थु झाली आहे. तुला इथे लोक राहू देणार नाहीत. माझ्याबरोबर शांत चल, असे बोलून फिर्यादीच्या घरी आला.
फिर्यादीचे घरातील वॉशिग मशीन घेऊन गेला. काही वेळाने परत हातामध्ये प्लॅस्टिकचे बाटलीत पेट्रोल घेऊन आला. तू माझी झाली नाही तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही, असे म्हणून फिर्यादीच्या अंगावर पेट्रोल टाकून काड्याची पेटी काढून तिने पेटविण्याचा प्रयत्न करु लागला.
तेव्हा फिर्यादी यांनी त्याला धक्का देऊन आतील खोलीत जाऊन दरवाजा लावून घेऊन स्वत:चा जीव वाचविला आहे. पोलिसांनी या जेलरला अटक केली असून पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.