लोणी काळभोर येथे महिलेकडून अफूची शेती, पोलिसांनी धाड टाकताच धक्कादायक प्रकार उघड..


लोणी काळभोर : पूर्व हवेलीतील आळंदी म्हातोबाची गावाच्या हद्दीत अफू या अंमली पदार्थाची लागवड केली जात होती. तसेच लोणी काळभोर पोलीसांनी महिला शेतकऱ्यावर कारवाई करून ४ किलो वजनाची अफूची ६६ झाडे जप्त केली आहेत.

हा प्रकार लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आळंदी म्हातोबा येथे उघडकीस आला आहे. तसेच जमीन मालक महिले विरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आळंदी म्हातोबा येथील एका शेतात अफूची झाडे असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली असता बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन छापा टाकला असता त्याठिकाणी शेत जमीनीमध्ये अफु या अंमलीपदार्थाची विक्री करण्याचे उद्देशाने, पिक लागवड करण्यात आल्याचे दिसून आले.

दरम्यान, यात ४० हजार रुपये किंमतीची ४ किलो वजनाची ६६ अफुची झाडे हस्तगत करण्यात आली असून जमीन मालक महिले विरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेला अटक करण्यात आली आहे.

ही कामगीरी पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलिस हवालदार रामहरी वणवे, गणेश सातपुते, प्रदीप क्षीरसागर, शैलेश कुदळे, नानापुरे अक्षय कटके व महिला पोलिस वनिता यादव, वैशाली निकंबे, तेलंगे यांच्या पथकाने केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!