वाल्मिक कराडला बीडमधून नाशिकच्या तुरुंगात हलवणार?, कोर्टाच्या सुनावणीनंतर उज्ज्वल निकम यांनी दिली मोठी माहिती…

बीड : मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या २२ जुलै रोजी होणार आहे. तसेच वाल्मिक कराडसह इतर आरोपींच्या प्रॉपर्टी जप्ती बाबतच्या अर्जावर आज युक्तिवाद झाला.

दरम्यान, आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची देखील उपस्थिती होती. यावेळी वाल्मिक कराडला दोष मुक्त करण्याच्या अर्जावर तसेच प्रॉपर्टी सील करण्याच्या अर्जावर देखील न्यायालय येत्या २२ जुलै रोजी निर्णय देणार असल्याची माहिती उज्वल निकम यांनी दिली आहे.
वाल्मिक कराडला बीडमधून नाशिकच्या तुरुंगात हलवणार? का संदर्भात सरकारी वकील उज्वल निकम यांनी माहिती देत सांगितलं की, वाल्मिक कराडला नाशिक कारागृहात हलवण्याचा निर्णय तुरुंग प्रशासनाचा आहे. न्यायालयात असला कुठल्याही प्रकारचा अर्ज आलेला नाही. सध्या वाल्मिक कराड बीड जिल्हा कारागृहात असल्याचे ही ते म्हणाले आहे.

उज्वल निकम म्हणाले की,वाल्मिक कराडला नाशिक कारागृहात हलवण्याचा निर्णय तुरुंग प्रशासनाचा आहे. न्यायालयात असला कुठल्याही प्रकारचा अर्ज आलेला नाही. सध्या वाल्मिक कराड बीड जिल्हा कारागृहात असल्याचे ही ते म्हणाले.

वाल्मीक कराड याच्या दोष मुक्ती अर्जाचा निकाल माननीय न्यायालय येत्या २२ जुलै रोजी देणार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केलं. त्याच प्रमाणे आरोपींची प्रॉपर्टी जप्त करण्याबाबत सरकारच्या वतीने अर्ज करण्यात आले होते. त्याचा देखील युक्तिवाद दोन्ही वकिलांमार्फत करण्यात आला.
त्याचा देखील निकाल येत्या २२ जुलै रोजी होणार आहे. असे आज न्यायालयाने घोषित केलं. इतर आरोपींचे देखील जे अर्ज होते ज्यामध्ये आरोपींची प्रॉपर्टी जप्त करू नये, यावर अर्जांवर देखील २२ जुलैलाच निर्णय होणार असल्याची माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली.