पुणे पोलीस दलात होणार मोठे बदल? गुन्हेगारांचे धाबे दणाणले, वाहतूक नियंत्रणसह अनेक प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवले, जाणून घ्या…


पुणे : सध्या पुणे शहराचे कार्यक्षेत्र झपाट्याने वाढत आहे. यामुळे पोलिसांवर अधिक ताण येत आहे. शहरातील गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी असलेल्या मनुष्यबळाला अधिक सक्षम करण्याची गरज आहे. यासाठी वाहतूक शाखेसाठी एक स्वतंत्र अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि सहा पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आहे.

हा प्रस्ताव पुणे पोलीस आयुक्तालयाने राज्य सरकारकडे दिला आहे. यामुळे येणाऱ्या काळात पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस दलात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात दोन नवीन सायबर पोलीस ठाण्यांची निर्मिती प्रस्तावित आहे.

यामुळे नागरिकांच्या सुरक्षेत मोठी सुधारणा होईल. वाहतूक शाखेत स्वतंत्र अतिरिक्त आयुक्त नेमल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक चांगली होईल. तसेच नव्या सायबर पोलीस ठाण्यांमुळे ऑनलाईन गुन्ह्यांचा वेळीच बंदोबस्त करता येईल. शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

राज्य सरकारकडून यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या नव्या उपाययोजनांमुळे नागरिकांना अधिक जलद आणि प्रभावी पोलीस सेवा मिळण्याची अपेक्षा आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

यामुळे आता येणाऱ्या काळात गुन्हेगारी कमी होणार का? हे लवकरच समजेल. सध्या मोठ्या प्रमाणावर गुन्हेगार, बलात्कार, कोयता गॅंग, छेडछाड अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. यामुळे पुणे पोलिसांचे नाव खराब होत आहे. यामुळे यामध्ये बदल करणे आवश्यक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!