जनगणना कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक लागणार? केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मुख्य सचिवांना पत्र, अंमलबजावणी होणार..


पुणे : जनगणना हे देशातील अत्यंत महत्त्वाचे प्रशासकीय काम मानले जाते. या जनगणनेच्या कामाची तयारी आता सुरू झाली असून कामात सहभागी असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना काही विशेष सवलती दिल्या जातात. या कर्मचाऱ्यांची बदली केली जाते मात्र आता जनगणनेचे काम होईपर्यंत या सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची बदली करु नये, असे पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाने मुख्य सचिवांना पाठवले आहे.या पत्राची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकार करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जनगणनेचा पहिला टप्पा म्हणजे घराची यादी करा व घरगुती गणना एप्रिल ते सप्टेंबर 2026 या कालावधीत केला जाणार आहे.दुसर्‍या टप्प्यात फेब्रुवारी 2027 मध्ये लोकसंख्या गणना होणार आहे. याच कालावधीतच जनगणना अधिकार्‍यांची नियुक्ती व प्रशिक्षण प्रक्रिया बहुतांश राज्यात सुरू झाली असून महाराष्ट्रातही याबाबत प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान जनगणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली होऊ नये यासाठी गृहमंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले

दरम्यान या पत्राची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकार करणार का? संबधीत कर्मचाऱ्यांना चालू वर्षांत होणाऱ्या बदल्यांतून सुट मिळणार का? महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार याकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. याबाबत सध्या प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात महसूल, जिल्हा परिषद,नगर विकास विभाग तसे शिक्षक वर्गाच्या नियोजित बदल्या मात्र रखडणार आहेत.या पत्रामुळे अधिकारी वर्गात पदोन्नती आणि बदल्या यावरून मोठ्या संभ्रम निर्माण झाला असून जनगणना कालावधीत पदोन्नती झाल्यास ती स्वीकारताना अडचणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रात याबाबत स्वतंत्रपणे कोणताही शासन निर्णय जाहीर झालेला नसल्याची माहिती समोर येत आहे. तरीही केंद्राच्या निर्देशांमुळे राज्यातही याची अंमलबजावणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!