प्रतिक्षा संपणार? आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, निवडणुकांच्या तारखांची घोषणा…..


पुणे : राज्यातील प्रलंबित महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून या परिषदेत निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे आता लवकरच या निवडणुका होतील, अशी चर्चा सुरु झाली आहे.सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घ्या, असे निर्देश सरकारला दिले आहे. या निर्देशानंतर सरकारमधील सर्वच पक्ष हे तयारीला लागले आहेत. त्यातच आता राज्य निवडणूक आयोगाची निवडणुकांची तयारी पूर्ण झाली आहे.निवडणूक आयोग तीन टप्प्यांत या निवडणुका घेईल, अशी योजना आखत आहे. यात सुरुवातीला नगर परिषदा आणि नगर पंचायती, त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आणि सर्वात शेवटी मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

सध्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.दरम्यान आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून नेमकी कोणती घोषणा होते, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतात का, संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल, आचारसंहिता कधी लागू होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!