शरद पवार एनडीएसोबत जाणार का? अखेर रोहित पवार यांनी सगळं खरं सांगून विषय संपवला, म्हणाले, आमचे काही लोकं…

नवी दिल्ली : दिल्लीत नुकतेच प्रफुल पटेल आणि पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला पुन्हा सुरुवात झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. असे असताना आमदार रोहित पवार यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
रोहित पवार यांनी ही शक्यता फेटाळून लावली. ते म्हणाले, शरद पवार हे जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते. ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत (एनडीए) जाणार नाहीत, असे स्पष्टीकरण रोहित पवार यांनी दिले आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शरद पवार मोदींना भेटले.

तरुणांवर होणारा अन्याय त्यांनी मांडला आहे. खासदार सुप्रिया सुळे या अमित शाह यांना भेटल्या. दिल्लीत रेवती सुळे- सारंग लखानी यांच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे. यासाठी सर्वांना आमंत्रण दिले आहे. एनडीए सोबत मी जाणार नाही, असे रोहित पवार यांनी ठणकावून सांगितले. शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत.


आमच्याकडचे बहुतांश आमदार-खासदार लढाईला तयार आहेत. मी लोकांसोबत, विचारासोबत राहिलो आहे. त्यामुळे पुढे जाऊन देखील मी लढणार आहे. असे म्हणत रोहित पवार यांनी शक्यता नाकारली आहे. यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय घडणार गे लवकरच समजेल.
दरम्यान, शरद पवार गटातील एक गट भाजपसोबत जाण्यास तयार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच सीईटी परीक्षेबाबत आक्षेप असणाऱ्या विद्यार्थांनी माहिती दिली आहे. पुरावे गोळा करत आहोत. तोपर्यंत काही बोलणार नाही, असेही ते म्हणाले. यामुळे येणाऱ्या काळात रोहित पवार काय भूमिका घेणार हे लवकरच समजेत.