मराठ्यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द होणार? वकील केदार यांच्या दाव्याने आरक्षणाच्या आंदोलनात ट्विस्ट

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात विविध राजकीय घडामोडी सुरू आहेत.मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषण केल्यानंतर सरकारकडून हैदराबाद गॅझेटबद्दलचा जीआर काढण्यात आला आहे. या जीआर विरोधात ओबीसीने आक्रमक भूमिका घेतली असताना आता वकील योगेश केदार यांनी मराठ्यांचं कुणबी प्रमाणपत्र कधीही रद्द होऊ शकतो असा दावा केला आहे त्यांच्या या दाव्याने आरक्षणाच्या आंदोलनात ट्विस्ट निर्माण झाला आहे.

राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात ओबीसींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनीही कोर्टात जाणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. हैदराबाद गॅझेटच्या धरतीवर ओबीसीमधील काही घटकांनी आता एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणखी चिघळणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना वकील योगेश केदार यांनी मराठा आंदोलनाच्या मागणीतील मोठी अडचण सांगितली आहे. त्यामुळे नवी मागणी चर्चेत आली आहे.
वकील योगेश केदार यांनी सांगितलं की, कुणबी प्रमाणपत्र कधीही रद्द होऊ शकतं. त्यामुळे कुणबी मराठा, मराठा कुणबी नावाने प्रमाणपत्र नको. त्यामुळे आम्हाला मराठा म्हणून आरक्षण द्या, अशी मागणी धाराशिवातील मराठा क्रांती मोर्चाने केली आहे’. त्यामुळे आता या नव्या दाव्यामुळ नवीन वादाला ठिणगी पडली आहे.
