मोठी बातमी! धनंजय मुंडे यांची आमदारकी जाणार? करुणा मुंडे यांची थेट हायकोर्टात याचिका, नेमकं कारण काय?


मुंबई : संपूर्ण राज्यात सध्या बीड जिल्ह्याची चर्चा आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे सतत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

अशातच आता सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

याप्रकरणात अडचणीत असलेल्या धनंजय मुंडे यांचे पाय आता आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. आता धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध करुणा मुंडे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. करुणा मुंडे यांच्यातर्फे ॲड. चंद्रकांत ठोंबरे हे काम पाहत आहेत.

करुणा मुंडे यांनी मुंबई हायकोर्टाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आणि इतर आरोप केले आहेत. या निवडणूक याचिकेचा स्टॅम्प नंबर ५०९/२०२५ असल्याचे ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांनी पत्रकात म्हटले आहे.

याचिकेत म्हटल्यानुसार, करुणा मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज ३० ऑक्टोबर २०२४ रोजी फेटाळला होता.

मात्र, धनंजय मुंडे आणि इतरांचे अर्ज मंजूर केले होते. परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी घोषित केले होते. त्यानंतर करुणा मुंडे यांनी ४ जानेवारी २०२५ रोजी खंडपीठात निवडणूक याचिका सादर केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!