लाडक्या बहिणींना मे महिन्यात ‘डबल गिफ्ट’ मिळणार? ₹1500 की ₹3000 यावर सस्पेन्स कायम


राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये सध्या मोठी चर्चा रंगली आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फेब्रुवारी महिन्यात अखेरचा हप्ता जमा झाल्यानंतर आता मे महिन्याची ४ तारीख उजाडली तरी खात्यात पैसे न आल्याने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्यातील सुमारे ५४ लाख महिलांचा लाभ ई-केवायसीनंतर बंद झाल्याची माहिती समोर आली आहे, तर सध्या १ कोटी ८९ लाख पात्र महिलांना दरमहा ₹1500 प्रमाणे लाभ मिळणार आहे. मात्र मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांचे हप्ते प्रलंबित असल्याने “एकत्र ₹3000 किंवा ₹4500 जमा होणार का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

काही लाभार्थ्यांनी जानेवारी-फेब्रुवारीचे हप्तेही मिळाले नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे त्या अपात्र ठरल्या आहेत का, की तांत्रिक अडचणीमुळे विलंब झाला आहे, याबाबत स्पष्टता अद्याप नाही. दुसरीकडे, बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुकांमुळे निधी वितरण थांबवण्यात आल्याचीही चर्चा आहे.

मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत हप्ता जमा केला जातो. त्यामुळे यावेळी किमान दोन महिन्यांचे ₹3000 एकत्र खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकूणच, लाडक्या बहिणींना मे महिन्यात ‘गुड न्यूज’ मिळण्याची चिन्हे आहेत. आता सरकारच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!