पार्थ पवारांवर सरकार इतकं मेहेरबान का? 99 टक्के मालकी असून गुन्हा नाही, पण 1 टक्के मालकी असलेल्या पाटलांवर गुन्हा दाखल..

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजिव पार्थ पवार यांच्या कंपनीवर पुण्यातील जमीन खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप होत आहे. कालच या प्रकरणात तिघांवर गुन्हे दाखल झाली. मात्र, 99 टक्के अमेडिया कंपनीचे शेअर हे पार्थ पवार यांच्या नावावर असताना त्याच्यावर गुन्हा दाखल न होता.

दिग्विजय पाटील याच्या नावावर या कंपनीचा फक्त 1 टक्का शेअर आहे आणि पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. 99 टक्के शेअर पार्थ पवार याच्या नावावर असताना देखील त्याच्यावर गुन्हा दाखल न झाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. संगनमत करुन शासनाचा 5 कोटी 89 लाख 31 हजार आठशे रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

गुन्हा दाखल झालेल्या अन्य तिघांमध्ये या जागेची पॉवर ऑफ एटर्नी असलेल्या शितल तेजवानी आणि रविंद्र तारू यांचा समावेश आहे, मात्र दिग्विजय पाटलांचे व्यवसायिक भागीदार असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. जर एका व्यावसायिक भागीदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसरा भागिदार असलेल्या पार्थ यांच्यावर गुन्हा का नाही असा प्रश्न उपस्थित झालाय.

नेमका घोटाळा काय?
शितल तेजवानींनी नुसत्या पॉवर ऑफ एटर्नीवर कोट्यवधींची जमीन विकली.
16.19 हेक्टर जमिनीच्या 300 कोटींच्या व्यवहारावर फक्त 500 रु. मुद्रांक शुल्क घेतले.
सूची 2 मध्ये मुंढवा पुणे शहरात असतानाही सोयीसाठी मुळशी तालुक्यात दाखवले.
सूची 2 मध्ये अमेडिया एंटरप्रायजेसच्या दिग्विजय पाटलांचे लिंग स्त्री असे लिहले.
1 टक्के मालकी असलेल्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा, 99 टक्के मालकी असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा नाही; कोण आहे दिग्विजय पाटील?
कोण आहेत दिग्विजय पाटील?
धाराशिव जिल्ह्यातल्या तेर गावचे मूळचे रहिवासी…
पार्थ पवार यांचे मामा अमरसिंह पाटील यांचे दिग्विजय हे पुत्र…
दिग्विजय पाटील सध्या पुण्यात वास्तव्यास.
तेरमधली वडिलोपार्जित जमीन कसण्यासाठी, कौटुंबिक कार्यक्रम, मतदानासाठी जातात तेरला.
सध्या तेरामध्ये दिग्विजय पाटलांच्या कुटुंबातल्या कोणाचेही वास्तव्य नाही.
