शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांची भेट का घेतली? आता खरं कारण आलं समोर, मोदी थेट बारामतीलाच येणार…

बारामती : गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली. आता या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांकडून बारामतीत येण्यासाठी आमंत्रण देण्यात आलं आहे.
शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारण्यात आलेल्या गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यासाठी हे आमंत्रण देण्यात आलं आहे. यामुळे ही भेट यासाठी घेतली असल्याचे सांगितले जात आहे.

विद्या प्रतिष्ठान मधील नक्षत्र गार्डनमध्ये गौतम बुद्धांचा हा पुतळ्याचे उभारण्यात येत आहे. आज शरद पवारांनी या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. २ ऑक्टोबरला किंवा १६ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न आहे. यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे.


पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप तारखेबाबत निर्णय कळवण्यात आलेला नाही. मात्र नरेंद्र मोदी येणार आहेत हे मानून बारामतीत तयारी केली जात आहे. शरद पवार यांचा निरोप पंतप्रधान शक्यतो मोडत नाहीत. यामुळे याबाबत ते येतील अशी माहिती आहे.
दरम्यान, विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ फुटी बुद्धांचा पुतळा नक्षत्र गार्डनमध्ये उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांसारख्या १३ महामानवांची पेंटींग्ज असणार आहेत. याबाबत काही दिवसांपासून तयारी सुरू आहे.