हनिमूनला गेले असताना पत्नीने का केली इंदूरच्या राजाची हत्या? धक्कादायक कारण आले समोर…

Raja Raghuvanshi Murder : मेघालयच्या शिलाँग शहरात हनिमूनसाठी गेलेलं इंदूरचं एक नवविवाहित जोडपं अचानक बेपत्ता झाले होते. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला, जेव्हा राजा रघुवंशीचा मृतदेह डोंगरावर आढळून आला आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी गायब असल्याचं स्पष्ट झाले.
राजा रघुवंशीच्या निर्घृण हत्येमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. हनिमूनसाठी मेघालयला गेलेल्या या नवविवाहित जोडप्यातील पतीचा मृतदेह २००० फूट खोल दरीत सापडला आणि पत्नी सोनम गायब होती. आता या प्रकरणात अत्यंत धक्कादायक आणि गुंतागुंतीचा खुलासा झाला आहे.
तसेच नुकताच विवाहबद्ध झालेल्या राजा रघुवंशीच्या निर्घृण हत्येमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. हनिमूनसाठी मेघालयला गेलेल्या या नवविवाहित जोडप्यातील पतीचा मृतदेह २००० फूट खोल दरीत सापडला आणि पत्नी सोनम गायब होती. आता या प्रकरणात अत्यंत धक्कादायक आणि गुंतागुंतीचा खुलासा झाला आहे.
पोलिस तपासात स्पष्ट झालं की, सोनमचे लग्नाआधी राज कुशवाह नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध होते. लग्न नको होतं, तरीही विवाह झाला आणि सोनमने आपल्या प्रियकरासोबत मिळून राजा रघुवंशीची हत्या करण्याचा कट रचला.
दरम्यान, २० मे रोजी दोघं शिलॉन्गला गेले, २३ मे रोजी होम स्टेमधून चेकआऊट केल्यानंतर दोघं बेपत्ता झाले. दुसऱ्या दिवशी त्यांची स्कूटी सोहरिम येथे बेवारस अवस्थेत सापडली. आणि २ जून रोजी राजा मृत अवस्थेत सापडला आहे.
८ जून रोजी सोनम उत्तर प्रदेशच्या गाजीपूर जिल्ह्यात नंदगंजमधील एका ढाब्याजवळ आढळून आली. तिने ढाबेवाल्याच्या फोनवरून आपल्या नातवाइकाला व्हिडिओ कॉल केला होता. याच माहितीवरून पोलिसांनी तिला शोधून काढलं आणि ताब्यात घेतलं. (Raja Raghuvanshi)
इंदूर पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. मेघालय पोलिसांनी या प्रकरणासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमले असून पुढील तपास सुरू आहे.