राज्यभरात मोठी खळबळ! ७२ आजी-माजी मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये कुणी अडकवलं? मास्टरमाईंड कोण? धक्कादायक माहिती आली समोर..

नाशिक : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा गोपनीय तपास पुन्हा सुरू करण्यात आला आहे. राज्यातील तब्बल ७२ सनदी अधिकारी, राजकीय नेते तसेच आजी आणि माजी मंत्री देखील ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याची तक्रार ठाणे पोलिसांकडे करण्यात आली आहे.

तसेच पोलिस उपनिरीक्षक, सहायक आयुक्त, पोलिस उपायुक्त, पोलिस उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, सहायक पोलिस आयुक्त अशा दर्जाच्या अधिकार्यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून खंडणी मागणार्या महिलेची आता गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी सुरू केली आहे.
त्यामुळे आता या प्रकरणामुळे फक्त नाशिकच नाही संपूर्ण राज्यात खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे.दरम्यान, या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून खंडणी मागणाऱ्या एका महिलेची गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणामुळे केवळ नाशिकमध्येच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली आहे.

एका बड्या राजकीय नेत्याने पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत या प्रकरणाची वाच्यता केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला. या ‘हनी ट्रॅप’ प्रकरणाची चर्चा सुरू होताच, राज्यातील अनेक अधिकारी पुढे येऊन आपली बाजू मांडू लागले आहेत. विशेषतः, महसूल विभागातील सर्वाधिक अधिकारी या जाळ्यात अडकल्याची माहिती मिळत असल्याने, या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, ठाण्यात एका राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या महिलेच्या मदतीने नाशिकमधील या अधिकाऱ्याला, एका राजकीय संबंध असलेल्या नाशिक येथील हॉटेल व्यावसायिकाने या प्रकरणात अडकवले होते.
दरम्यान, ‘हनी ट्रॅप’चा ‘मास्टरमाईंड’ कोण आहे त्यावरून पडदा उठत चालला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ‘मास्टरमाईंड’ नाशिकमधीलच असून, तो एका मोठ्या राजकीय पक्षाचा माजी पदाधिकारी असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासाला नाशिकमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून सुरुवात झाली आहे.