करुणा मुंडेंच्या गाडीत पिस्तुल कुणी ठेवलं? साडी नेसून बंदूक ठेवलेल्या पोलिसाचं नाव जाहीर, सुरेश धस यांचा मोठा गौप्यस्फोट…

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्याचे नाव मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत येत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यात आक्रमक भूमिका घेतली आहे.
याच पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी मोठा आरोप केला आहे. करुणा मुंडे जेव्हा परळीला गेल्या होत्या तेव्हा त्यांच्या गाडीमध्ये बंदूक ठेवण्यात आलेलं होतं. हे बंदूक एका पोलिसाने साडी नेसून गाडीमध्ये ठेवलं होतं, असा आरोप सुरेश धस यांनी केला होता.
याच प्रकरणामुळे करुणा मुंडेंना जेलवारी भोगावी लागली होती. त्यांना बीडच्या जेलमध्ये ठेवण्यात आलेले होते. त्या प्रकरणात पोलिसच सहभागी होता, असा गौप्यस्फोट धसांनी केला. संतोष देशमुख यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी पैठणमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा ते बोलत होते.
सुरेश धस पुढे म्हणाले की, बीडमध्ये आणि परळीमध्ये खरेखुरे पोलिस पाठवण्यापेक्षा सोनी टीव्हीवरच्या सीआयडी मालिकेतले पोलिस पाठवावेत. नाहीतरी हे पोलिस अभिनय करीत आहेत, असा टोला धसांनी लागवला.
सुरेश धस यांनी यांनी वाल्मिक कराड आणि त्याच्याशी संबंधित लोकांच्या मालमत्तेची यादीच वाचून दाखवली. पुण्यामध्ये असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता आणि त्यांच्या किंमती सुरेश धस यांनी पुराव्यानिशी दाखवून दिल्या आहे.
परळीत इराणी समाजचे काही लोक आहेत. ते लोक गांजा, चरस आणि पिस्तुलाचा काळा बाजार करतात. थर्मलमध्ये रोज भंगार चोरीला जातं. त्यातही आकाचा वाटा असतो. करुणा मुंडे किंवा डॉक्टर देशमुख असोत. यांच्यावर खोट्या अट्रॉसिटी दाखल करण्यात आलेल्या आहेत.
करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये बंदूक ठेवलेल्या पोलिसाचं नाव संजय सानप असं आहे. त्याच्या जोडीला आणखी दोघे आहेत. यांनी बुरखा नेसून गाडीत बंदूक ठेवली. त्या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी आहेत, तरीही त्यांनी असं केलं आणि त्यांना जेलमध्ये टाकलं. असे ते म्हणाले. यामुळे पुन्हा राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.