देशाचे पंतप्रधान कोण? बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांचा धडक छापा; २ प्रश्न विचारताच बांगलादेशी महिलांची पोलखोल..


पुणे : पुण्यात परदेशी नागरिकांच्या अवैध वास्तव्यासंदर्भात पोलिसांकडून सुरू असलेल्या तपास मोहिमेत आणखी एक कारवाई समोर आली आहे. बुधवार पेठ परिसरात फरासखाना पोलिसांनी केलेल्या विशेष कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान ५ परदेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, या महिला भारतात वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्यास होत्या आणि त्या देहव्यवसायाशी संबंधित कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपासादरम्यान त्यांच्याकडे आवश्यक परवानगी किंवा ओळखपत्रे आढळून आली नाहीत.

कारवाईदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या महिलांची चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी स्वतःला पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याचे सांगितले. मात्र चौकशी पुढे वाढवल्यानंतर त्यांच्या निवेदनांमध्ये विसंगती आढळल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक सखोल पडताळणी केली असून, त्यांच्या ओळखीसंदर्भात आवश्यक कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

फरासखाना पोलिसांनी रविवारी रात्री ते सोमवारी सकाळपर्यंत बुधवार पेठ परिसरात सघन तपास मोहीम राबवली. या मोहिमेत माचिस बिल्डिंगसह परिसरातील विविध ठिकाणी तपासणी करण्यात आली असून, बेकायदेशीर वास्तव्यासंदर्भात पुढील चौकशी सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!