फडणवीसांच्या नागपुरच्या बालेकिल्ल्यात कोणाची आघाडी? भाजप कितव्या स्थानावर? धक्कादायक निकाल समोर…

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्ला असलेला नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे विरोधकांचा सापडा सूप झाला आहे. यामुळे भाजपच्या गटात आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोस्टल बॅलेट आणि ईव्हीएम या दोन्ही माध्यमांतून मतमोजणी सुरू असून, बहुतांश ठिकाणी पोस्टल मतमोजणी पूर्ण झाली आहे. नागपूर महानगरपालिकेत एकूण 151 प्रभाग असून, 2017 मध्ये झालेल्या निवडणुकांत भाजपने 108 जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले होते. अजून मतमोजणी सुरू आहे. 2017 मध्ये बहुमताने जिंकलेल्या भाजपला यंदा ही सत्ता स्थापन करता येणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.
आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा होत असलेल्या या निवडणुकीत भाजप आपला गड राखणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नागपूरमध्ये पोस्टल बॅलेटसह ईव्हीएम मतमोजणीला सुरूवात झाली असून, बहुतांश मतदान केंद्रांवर पोस्ट मतमोजणी पूर्ण झाली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे. मुस्लिमबहुल प्रभागातही भाजप पुढे असल्याचे सुरुवातीच्या कलांमधून दिसत आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या बालोकिल्ल्यात काय निकाल येईल याकडे सर्वांचं लक्ष आहे. या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणावर सभा घेतल्या होत्या. यामुळे याठिकाणी काय निकाल लागणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत आता चित्र स्पष्ट होत आहे.
राज्यातील इतर महानगरपालिकेत देखील भाजपचा मोठा विजय होताना दिसून येत आहे. यामुळे येणाऱ्या काळात केंद्रापासून स्थानिक पातळीवर देखील भाजपचीच सत्ता असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये गडबड असल्याचे सांगितले जात आहे