बीड जिल्ह्यात चाललंय तरी काय?, अंबाजोगाईत हवेत गोळीबार, घटनेने उडाली खळबळ..


बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अजुनही पोलिसांचा तपास सुरू आहे. राज्यातील अनेक यंत्रणा या हत्येप्रकरणी चौकशी करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे.

विशेष म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पोलिसांनी बीड जिल्ह्यातील अनेकांचे शस्त्र परवाने रद्द केले. दहशत माजवणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला होता.

पण असं असलं तरी, पोलिसांचा वचक बीडमधील हल्लेखोरांवर नाही असंच पाहायला मिळते आहे. कारण संतोष देशमुख हत्येनंतर अंबाजोगाई परिसरात गावठी कट्ट्याने गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे.

बीडच्या अंबाजोगाईत हवेत गोळीबार झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. जमिनीच्या वादातून मोरेवाडी परिसरात हवेत गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गोळीबार करण्याचा उद्देश नेमका काय होता? यासाठी पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरातील हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा कायम चर्चेत आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने बीडसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला.

तर काल ( ता.१६)आष्टीमध्ये दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यानंतर आता बीडच्या अंबाजोगाईत जमिनीच्या वादातून मोरेवाडी परिसरात हवेत गोळीबार झाल्याचं सांगण्यात येत आहे.

बीडमध्ये असलेल्या अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरात आज दुपारी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. जमिनीच्या वादातून हवेत गोळीबार करण्यात आला, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटनेनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत.

मोरेवाडी परिसरात नेमकं काय घडलं?, याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र जमिनीच्या वादातून हवेत गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!