काय सांगता! महाराष्ट्रात ‘या’ गावात टक्कल व्हायरसचा धुमाकूळ, तीन दिवसांत लोक होतात टकले, नेमकं कारण काय?

मुंबई : तीन वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसने सगळीकडे धुमाकूळ घातला होता. असे असताना आता महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात सध्या एका वेगळ्याच व्हायरसने धूमाकूळ घातला आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या व्हायरसामुळे नागरिकांना अचानक टक्कल पडण्याची समस्या उद्भवली आहे. केवळ तीन दिवसांत लोकांच्या डोक्याचे केस गळून टक्कल पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे याबाबत तज्ञ आढावा घेत आहेत.
याबाबत माहिती अशी की, सुरुवातीला डोक्याला खाज सुटण्याची आणि नंतर केस गळत आहेत. नंतर तिसऱ्या दिवशी मात्र पूर्णपणे टक्कल पडण्याची घटना घडते. अनेक कुटुंबांतील सदस्य एकाच वेळी या समस्येचा बळी ठरत आहेत.
यामुळे यावर उपाय शोधला जात आहे. या अज्ञात व्हायरसचे संक्रमण लवकरच एक मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. शांपू किंवा अन्य केमिकल्समुळे होऊ शकते, पण ज्या लोकांनी कधीच शांपू वापरला नाही. त्यांचेही केस गळत आहेत.
यामुळे अज्ञात व्हायरस असल्याचे तज्ज्ञ मानत आहेत. शेगाव तालुका शिवसेनाप्रमुख रामेश्वर थारकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, उपचार शिबिरे लावण्याची मागणी केली आहे. यामुळे मात्र भीती निर्माण झाली आहे.
महिलाही याचा शिकार होत आहेत. या व्हायरसचा प्रसार शेगाव आणि आसपासच्या भागात झपाट्याने झाला असून, प्रशासन मात्र अजूनही यावर ठोस उपाययोजना करत नाही. लोकांनी यावर उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. अनेक कुटुंबांतील सदस्य एकाच वेळी या समस्येचा बळी ठरत आहेत.