हॉटेलमध्ये जेवण करायला गेलेल्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या; इंदापूरतील घटना


इंदापूर : हॉटेलमध्ये जेवण करायला गेलेल्या तरुणाची गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत तरुण पुण्यातील आळंदी परिसरातील राहिवासी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण काल रात्री तो आपल्या मित्रांसह जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. यावेळी अचानक दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडून धारदार शस्त्रांनी वार केले. या हल्ल्यात तो जागीच मृत झाला.

हा हल्ला कोणी केला? कशासाठी केला? याची माहिती अजून समजली नाही. पण हा हल्ला पूर्व वैमानसातून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत. या प्रकरणातील आरोपींचा लवकरच शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!