लॉजवर गेला, दारू पिला अन् घडलं आक्रीत, पुण्यातील चंदननगर भागात धक्कादायक घटना…


पुणे : चंदननगर परिसरातील पठारे मळा येथील श्री लॉजवर एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याला मागील काही महिन्यांपासून दारूचे व्यसन जडले असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये समोर आले आहे.

आकाश सुनील साबळे (वय. २५, रा. चंदननगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, शुक्रवारी (ता.१४) आकाश हा रंग खेळल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत त्याच्या मित्रासोबत साईनाथ नगर येथील श्री लॉजवर गेला होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. वारंवार त्याचे त्या लॉजवर दारू पिण्यासाठी येणे-जाणे होते. घटनेच्या दिवशीही त्याने एटीएममधून पैसे काढून भरपूर दारू प्यायली. यावेळी त्याच्या मित्रांनी त्याच्या खिशातील पैसे काढून त्याच्या घरी नेऊन दिले.

तसेच त्याला अस्वस्थ वाटत असल्याचे देखील सांगितले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या मित्रांनी लॉजवर जाऊन आकाशला उठविण्याचा व आवाज देण्याचा प्रयत्न केला; परंतु तो झोपला असेल म्हणून त्यांनी त्याला उठवले नाही. त्याला झोपू दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी मित्र त्याला उठवायला गेले.

त्याला जोराजोरात आवाज देऊनही तो न उठल्याने दरवाजा उघडून तपासणी केली असता तो मयत झाल्याचा संशय आला. यानंतर पोलिसांना कळवत आकाशला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. याप्रकणी पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!