Wedding : आता लग्नात निमंत्रणाशिवाय जेवण करणं महागात पडणार, दोन वर्षांपर्यंतचा होऊ शकतो तुरुंगवास, नेमकं घडलं काय?

Wedding : भारतीय लग्नांमधील जेवण चर्चेचा विषय असते. मात्र, कधीतरी लग्नांमध्ये ‘बिन बुलाऐ मेहमान’ म्हणजेच आमंत्रण नसलेले आगंतुक हजेरी लावून जेवणावर ताव मारून जातात. हे लोक ना मुलीकडून असतात ना मुलाकडून. वाहत्या गंगेत हात धुवून घेऊया म्हणत हे असे लोक जेवण आवडेल त्या लग्नाला हजेरी लावतात.
बऱ्याचदा असे लोक म्हणजे ‘थ्री इडियट्स’मध्ये दाखविल्याप्रमाणे हॉस्टेलमध्ये राहणारी मुले असतात. अनेकदा तर संपूर्ण कुटुंब काही ना काही ओळख काढून लग्नांमध्ये येऊन ताव मारून जाते. जेवणावर ताव मारणे या एकमेव उद्देशाने अशी लोक आलेली असतात.
तुम्हाही अशी चूक करत असाल तर सावधान.. कारण या छोट्या चुकीमुळे तुम्हाला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. एखाद्या कार्यक्रमाला आमंत्रण नसताना उपस्थिती लावल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. इतकेच नाही तर दोन वर्ष तुरुंगात जावं लागू शकतं. गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये लग्नाला न बोलवता गेल्यामुळे दोन जणांना अटक करण्यात आले होते.
लग्नात मोफत जेवण केल्यामुळे दोन जणांना उत्तर प्रदेशमध्ये अटक करण्यात आली. फुकटात जेवण करण या दोघांना महागात पडलेय. झालं असं की, लखनौमध्ये एका लग्नात दोन जणांनी हजेरी लावली. त्यानंतर पोटभर जेवणही केले अन् बिंदास्त डान्स केला.
त्यांचा डान्स पाहिल्यानंतर लग्नातील काही लोकांना त्यांच्यावर संशय आला. काही जणांनी त्या दोघांना ताब्यात घेतले अन् पोलिसांना बोलवलं. त्यांची विचारपूस केली असता ते लग्नातील दोन्ही बाजूकडच्या कुणाच्याच ओळखीतले नव्हते. पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. त्यानंतर त्यांची रवानगी थेट तुरुंगात झाली. Wedding
जर तुम्ही लग्नसमारंभात आमंत्रणाशिवाय जाऊन जेवणावर ताव मारण्याचा विचार करत असाल तर थांबा, अशी चूक तुम्हाला महागात पडू शकते. तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो. याबाबत वकील उज्ज्वल त्यागी यांनी सोशल मीडियावर माहिती दिली.
त्यागी यांनी व्हिडीओत सांगितले आहे की , जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमात न बोलवता जात असाल तर हा गुन्हा आहे. तुमच्यावर भादवि कलम ४४२ आणि ४५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. यामध्ये दोन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. लग्नसमारंभात न बोलवता जाणं ट्रेसपासिंगचा प्रकार आहे. त्यागी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला कमेंट्सचा पाऊस पडत आहे.