लग्न जमलं, पत्रिका छापल्या, मंडप सजला अन् नवरी म्हणाली माझं दुसऱ्यावर प्रेम!! वडिलांनी थेट गोळ्या घालूनच केली मुलीची हत्या…


एका धक्कादायक घटनेने सध्या मध्य प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. येथील ग्वालियर येथे हत्येची एक थरारक घटना घडली आहे. लग्न ठरलेल्या मुलीची वडिलांनी गोळ्या घालून हत्या केली. यामुळे याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू झाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

हत्येपूर्वी तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तनू असे मृत मुलीचे नाव असून वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत या मुलीने माझे कुटुंब जबरदस्तीने लग्न लावून देत असल्याचा आणि कुटुंबीयांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला होता.

घरच्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रकार समोर आला आहे. माझे दुसऱ्या मुलावर प्रेम असल्याचेही तिने सांगितले होते. मुलीने व्हिडीओ शेअर करत बदनामी केली. यामुळे समाजात आपली पत खराब झाल्याचा राग वडिलांना होता. या रागातून त्यांनी मुलीवर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. चुलत भावानेही तिच्यावर गोळ्या झाडल्या.

यामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला. सोशल मीडियावर तिने एक विडिओ टाकला होता. यामध्ये मला विकीशी लग्न करायचे आहे. आधी माझ्या कुटुंबानेही यास परवानगी दिली होती. पण नंतर त्यांनी नकार दिला. ते मला रोज मारतात, माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला माझे कुटुंबीय जबाबदार असतील, असे विडिओमध्ये म्हटले होते.

पोलिसांनी तिला समजावून सांगण्यासाठी ते घरी गेले होते. तसेच गावातील लोकं बोलावण्यात आलो होती. मात्र मुलीने ऐकले नाही. यामुळे वडिलांनी तिची गोळ्या झाडून हत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!