Weather Update : राज्यात आजही अनेक ठिकाणी पाऊस बरसणार, हवामान विभागाचा इशारा, जाणून घ्या…

Weather Update : राज्यात हवामान विभागाने आज राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच आज सकाळी वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या चारही उपविभागांमध्ये आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात आज व उद्या तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात आज काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. Weather Update
विदर्भात सुद्धा आजपासून तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र, पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मेघगर्जना व विजांच्या कडकडाट होऊन ३० ते ४० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.